सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी


            Sukanya Samriddhi yojana In marathi | सुकन्या समृद्धी योजना 2021 (SSY 2021 in marathi) ही केंद्र शासनाची मुलींसाठीची महत्वाकांक्षी योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या अभियानअंतर्गत ही योजना २२ जानेवारी, २०१५ रोजी देशभरात सुरू केली. ही योजना विशेष मुलींसाठी असून, केंद्र शासनाची सर्वात कमी गुंतवणूकीची बचत योजना आहे. मुलींच्या लग्नाच्या वेळी किंवा उच्च शिक्षण घेताना ही गुंतवणूक अतिशय फायदेशीर ठरते. या योजनेला 'पंतप्रधान सुकन्या योजना' असेही म्हणतात.

सुकन्या समृद्धि योजना माहिती मराठी Sukanya Samriddhi yojana in marathi


            केंद्र आणि राज्य शासनाद्वारे बँकां किंवा पोस्ट ऑफिसमार्फत गुंतवणुकीच्या व बचत ठेवीच्या बऱ्याच योजना राबविल्या जातात. त्यापैकी सुकन्या समृद्धी योजना ही मुलींचे लग्न, शिक्षण, आरोग्य तसेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणूकीची बचत योजना आहे. यामध्ये मुलींच्या आईवडिल यांच्याकडून कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ मुलीच्या भविष्यासाठी घेऊ शकतात. अशा बँक किंवा पोस्ट खात्यास सुकन्या समृद्धी खाते (Sukanya Samriddhi Account) असेही म्हणतात.


            सुकन्या समृद्धी बँक किंवा पोस्ट खात्यात दरवर्षी किमान रु. २५०/- किंवा जास्तीत जास्त १.५ लाख पर्यंत रक्कम भरून गुंतवणूक सुरू करता येते. खाते उघडल्यापासूनच्या तारखेपासून ते मुलीचे २१ वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीच्या लग्नाच्यावेळी योजनेची मॅच्युरिटी होते व चांगल्या व्याजदराने ठेवी परत मिळतात.


सुकन्या समृद्धी योजना माहिती:


सुकन्या समृद्धी योजना 2021 ठळक वैशिष्ट्ये:

१. मुदत ठेवीचा कालावधी मुलीचे सुकन्या समृद्धी खाते उघडण्यापासून २१ वर्ष एवढा आहे.

२. सुकन्या समृद्धी योजनेचा अवधी २१ वर्ष असला तरीही मात्र सुरवातीच्या १४ वर्षांपर्यंत पैसे भरायाचे असतात.

३. मुलीचे २१ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी जर मुलीचे लग्न झाले तर सुकन्या समृद्धी योजना खाते आपोआप बंद होते.

४. मॅच्युरिटी नंतर म्हणजेच मुलीच्या वयाची २१ वर्ष पूर्ण झाल्यावर खाते बंद न केल्यास शिल्लक रकमेवर बँक किंवा पोस्ट खात्याच्या चालू व्याजदरात व्याज मिळत राहते.

५. मुलीने १८ वर्ष पूर्ण केल्यास, मुलीच्या उच्च शिक्षणासाठी मागील आर्थिक वर्षाच्या शिल्लकवर ५०% रक्कम अकाली काढता येऊ शकते.

६. आयकर कायदा १९६१, कलम ८०-सी  (Income Tax Act, 1961 80C ) या कायद्याअंतर्गत कर भरण्यात पूर्ण मिळवता येते (sukanya samriddhi yojana tax benefits).

७. दरवर्षी किमान रुपये २५०/- सुकन्या समृद्धी खात्यात जमा नाही केले तर खाते बंद होते. मात्र, खाते पुन्हा सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी ५०/- रुपये दंड भरुन खाते पुन्हा सुरू करता येते.

८. खाते धारकाचा मृत्यू झाल्यास पालकांना व्याजासाहित जमा रक्कम मिळते.

९. सुकन्या समृद्धी बचत ठेव गुंतवणूक भारत सरकारची १००% सुरक्षित योजना आहे.


सुकन्या योजना कागदपत्रे:

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

१. सुकन्या समृद्धी योजना (प्रपत्र ) फॉर्म (फॉर्म pdf मध्ये खाली पहा)

२. मुलीचा जन्म दाखला

३. पॅनकार्ड

४. आधारकार्ड

५. मतदार ओळखपत्र

६. रेशनकार्ड, वीजबिल

वरील कागदपत्रे पालकांची असावीत. पालक म्हणजे आईवडील किंवा कायदेशीररित्या मुलीचा सांभाळ करत असलेली व्यक्ती.


सुकन्या समृद्धी योजना पोस्ट ऑफिस:

            भारतीय डाक विभागामार्फत sukanya samriddhi yojana post office सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळवला जाऊ शकतो. याकरिता जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस sukanya samriddhi yojana post office मध्ये जाऊन फॉर्म भरा. सोबत आवश्यक असलेले कागदपत्रे आणि डिपॉझीट रक्कम (कमीत कमी २५०/-) भरा. कागदपत्रे आणि इतर बाबींची पडताळणी झाल्यावर सुकन्या समृद्धी खाते सुरू करता येते. पोस्टामार्फत अकाउंट होल्डरला पासूबुक पुरवले जाते. पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत राष्ट्रीय बँकेत हे खाते उघडले जाऊ शकते.


सुकन्या समृद्धी योजना 2021 पात्रता/निकष:

सुकन्या समृद्धी योजनेची निकष/पात्रता sukanya samriddhi yojana eligibility खालील प्रमाणे:

१. सुकन्या समृद्धी योजना 2021 योजनेंतर्गत केवळ १० वर्षाखालील मुली लाभ घेऊ शकतात.

२. पालकांना दोन मुली असतील तर दोघींसाठी दोन बचत खाती सुरू करता येऊ शकतात. मातेच्या प्रसूतीवेळी जुळ्या किंवा तीळया मुली झाल्यास त्यांच्याही नावे सुकन्या समृद्धी खाते उघण्याची अनुमती आहे.

३. सुकन्या समृद्धी बँक खात्यात नगद, डिमांड ड्राफ्ट, चेक  किंवा बँकेत कोअर बँकिंग सिस्टमने रक्कम ट्रान्सफर करता येते.

४. २१ वर्षानंतर सुकन्या समृद्धी खाते बंद होऊन पैसे पालकांच्या स्वाधीन केले जातील.


सुकन्या समृद्धी योजना व्याजदर:

                सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर (sukanya samriddhi yojana interest rate) दरवेळी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या निकषांवर कमी-जास्त होत असतो. तिमाही आधारावर भारत सरकार व्याजदर जाहीर होते. योजनेच्या सुरवातीस म्हणजे २०१५ मध्ये ९.१% एवढे व्याजदर देण्यात आले होते. सध्या सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर (sukanya samriddhi interest rate 2021) ७.६% एवढा आहे. (०६ जुलै, २०२१ पर्यंत अद्ययावत).


सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर:

                    खाली दिलेले सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर Sukanya Samriddhi Calculator (Excel Sheet) मध्ये पहा. त्यानुसार कॅल्क्युलेटर ती रक्कम सांगेल जी मॅच्युरिटी तुम्हाला दिली जाईल. ती रक्कम अचूक कळण्यासाठी दर वर्षी (१४ वर्षापर्यंत) किमान एक समान  रक्कम भरणे आवश्यक आहे. १५ ते २१ वर्षेमध्ये कोणतीही रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. त्या वर्षांदरम्यान मागील भरलेल्या रक्कमेवर लाभ कॅल्क्युलेट केला जातो. मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारी एकूण रक्कम सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटरद्वारे समजु शकते.




उदाहरण:

     सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा ३०००/- गुंतवणूक केल्यास १४ वर्षांनी ७.६% दराने चक्रवाढ व्याज पद्धतीने ९ लाख ११ हजार ५७४ एवढे रुपये मिळतील. तर २१ वर्षाच्या मॅच्युरिटीवर एकूण १५ लाख २२ हजार २२१ रुपये मिळतील.

सुकन्या समृद्धी योजना बद्दल माहिती सांगा:

सुकन्या समृद्धी योजनेबद्दल इतर माहिती (सुकन्या समृद्धी योजना प्रश्नोत्तरे):

१. सुकन्या समृद्धी योजना बचत खाते कोणाच्या नावे उघडावे?

उत्तर: मुलगी दहा वर्षाची होईपर्यंत मुलीच्या पालकांना मुलीच्या नावे सुकन्या योजना बचत खाते उघडता येते.

२. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत कर्ज सुविधा किती आहे?

उत्तर: सुकन्या योजनेअंतर्गत कोणतीही कर्ज सुविधा उपलब्ध नाही. मात्र, मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावर ५०% रक्कम अकाली काढता येते.

३. NRI लोकांना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येतो काय?

उत्तर: नाही. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ फक्त निवासी भारतीय लोकांना (मुलींना) मिळवता येतो.

४. सुकन्या समृद्धी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो काय?

उत्तर: नाही. सध्या सुकन्या समृद्धी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज (Sukanya Samriddhi Yojana online) करण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.

५. सुकन्या समृद्धी योजनेचे अधिकृत संकेतस्थळ (Sukanya Samriddhi Yojana official website) कोणतं?

उत्तर: सुकन्या समृद्धी योजनेचे सध्या कोणतेही स्वतंत्र अधिकृत संकेतस्थळ Sukanya Samriddhi Yojana official website नाही.